twitter

Showing posts with label माणुसकी. Show all posts
Showing posts with label माणुसकी. Show all posts

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.





आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !


पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे. समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. 

स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे. माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात.





गाडी चालविणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता बाळगायला पाहिजे.

आपल्याला काय वाटते........??????