twitter

Showing posts with label आयुष्य. Show all posts
Showing posts with label आयुष्य. Show all posts



आयुष्य खूप सुंदर आहे
पण त्याला जगता आलं पाहिजे
फुल खुंटन्याआधी त्यालाही मन आहे
हे जाणता आलं पाहिजे !!

दुःखाची बेरीज सगळेच करतात
पण दुःखात ही हसता आलं पाहिजे
सुखात ही सगळेच हसतात
पण दुसर्याच सुखही आपलंच मानता आलं पाहिजे !!

जीवनाच्या वाटेवर खूप माणस मिळतात
माणसात माणूस शोधता आलं पाहिजे
अनेक नाती जोडता जोडता जीवनभर
मैत्रीचं, प्रेमाचं अतूट नात जपता आलं पाहिजे !!

आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर


"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे.

आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर !!



आयुष्य म्हणजे कटकट
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं


आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.......