twitter


आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा


घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!


कधी अस वाटतं कि आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!

तूटलेले मन आणि अपुर्ण स्वप्न यापेक्षा,
तूटलेली खेळनी आणि अपुर्ण गृहपाठच बरा होता !!

BOSSचा ओरडा आणि WORK LODE यापेक्षा,
बाईँच्या छड्या आणि क्षणभंगुर रागच बरा होता !!

PROJECT FILE आणि PRESENTATIONचा धाक यापेक्षा,
चिञकलेची वही आणि भाषनाची स्पर्धाच बरी होती !!

प्रेस केलेला FORMAL आणि SUITABLE TIE यापेक्षा,
चुरगळलेला गणवेश आणि सुटलेली बूठाची लेसच बरी होती !!


OFFICEची भरगच्च BAG आणि LAPTOP यापेक्षा,
अर्धवट भरलेली WATER BAG आणि शाळेच दप्तरच बर होतं !!

रजेच APPLICATION आणि LIVEसाठीचा FORM यापेक्षा,
शाळेला मारलेली दांडी आणि आजारपणाच नाटकच बर होतं !!

CAFETERIAमधल जेवन आणि थंडगार COLDRINK यापेक्षा,
डब्याच रींगन आणि बर्फाचा गोळाच बरा होता !!

घड्याळाचे वेध आणि कामावरुन वेळ यापेक्षा,
वंन्दे मातरमचे बोल आणि शाळेचा घंटानादच बरा होता !!

खरचं ! आता अस वाटत कि आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!


लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे


लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो


ज्या देशातील बहुसंख्य हिंदूच आपल्या देवादिकांची टिंगल करत, मोठ्या कौतुकाने त्यांच्यावर विनोद करतात. चित्रपट आणि नाटकातील त्यांचे विडंबन खपउन घेतात, त्या हिंदुना रशियामध्ये भगवत गीतेवर बंदी घालायची कोर्टात याचिका दाखल केली जाते त्याचे कसले सोयर सुतक असणार ? आम्ही फक्त बेंबीच्या देठा पासून ओरडणार " गर्वसे कहो हम हिंदू है " 


क्रिश्चन लोकांना त्यांच्या बायबलाचा आणि मुस्लीम लोकांना त्यांच्या कुराणाचा जितका अभिमान आहे, तितका आपल्या हिंदू लोकांना भगवत गीते विषयी आहे का ? तर नाही हेच उत्तर आहे. ९० टक्के क्रिश्चन आणि मुस्लिमांच्या घरात त्यांचे पवित्र ग्रंथ असतात, तर ९० टक्के हिंदूंच्या घरात भगवत गीता नसतेच. स्वताच्या धर्मा विषयी अनास्था असलेला एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म.

इस्कोन चे संस्थापक प्रभुपाद स्वामी यांनी लिहिलेली भगवत गीता मराठी, हिंदी, इंग्रजी पासून जगभरातल्या ८० भाषा मध्ये उपलब्ध आहे. गेल्या ४० वर्षामध्ये त्याच्या ४० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्याच आपल्या पवित्र धर्म ग्रंथावर रशियामध्ये बंदी आणायची याचिका दाखल होते, आणि इथले सारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना मुर्दाडा सारखे गप्प बसून आहेत. केवळ धार्मिक तेढ वाढवायची आणि सत्तेचे राजकारण करायचे हाच यांचा हिंदुत्ववाद. नशीब विजू जनता दलाच्या एका खासदाराने हा प्रश्न संसदेत उपस्थित केला तेव्हा सारेच पक्ष जागे झाले आणि त्यांनी सदर घटनेचा निषेध केला.


थोडा विचार करा ....

कुठलाही वाईट शब्द बोलण्यापूर्वी ज्यांना बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही...त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करा....

पुढ्यातल्या अन्नाबद्दल तक्रार करण्यापूर्वी ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचा विचार करा.....

नवरा किंवा बायकोची तक्रार करण्यापूर्वी ज्यांच्या आयुष्यात सोबतच राहिलेली नाही म्हणून देवाजवळ रडतात त्यांचा विचार करा.....

ज्या खराब रस्त्याने गाडीतून चालला आहात त्या रस्त्याबद्दल तक्रार करण्यापूर्वी त्याच रस्त्याने पायी चालत गेलेल्यांचा विचार करा.....





आपल्या थकवणाऱ्या कामाची तक्रार करण्यापूर्वी जे काम करू शकतच नाहीत अश्या अपंगांचा आणि ज्यांच्याकडे काही कामंच नाही अश्या बेरोजगारांचा विचार करा.....

आयुष्याबद्दल तक्रार करण्यापूर्वी जे अर्धेअधिक आयुष्य न जगताच अकाली देवाघरी गेलेत त्यांचा विचार करा......

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे........

अपयशात कुठलेही वाईट, नकारार्थी विचार आपल्याला संपवायला बघतील, त्यापूर्वीच चेहऱ्यावर हास्य आणा आणि स्वतःलाच सांगा की मी या जगात असून अजून जिवंत आहे याचाच अर्थ मला अजूनही जिंकण्याची संधी आहे.......

आणि ती मी साधणारच..


गरज आहे आज मला... ..... .
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची
गरज आहे आज मला... ..... ...
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची


गरज आहे आज मला... ..... ..... .
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची
गरज आहे आजहि मला.... ..... .
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची
गरज आहे मला
खूप गरज आहे..... ..... ...
मला तुझी खूप आठवण येते .....


काय
लागतं
नक्की कुणीतरी आपल्या मनाच्या जवळ
यायला?

... तसं समोरची व्यक्ती दिसायला
... सुंदर असलं कि,लक्ष पटकन जाते
आणि आवडायची क्रिया पण पटकन सुरु
होते हे मान्य
आहे.

पण कधी कधी समोरची व्यक्तीला न
पाहता पण ती व्यक्ती तुमच्या मनात घर
करून
जाते.

मनात घर करायला फक्त
तश्या प्रसंगाची गरज असते,
समोरची व्यक्ती कधी कधी
आपण ज्या मनस्थितीतून जात आहोत,
... त्या परिस्थितीत
आपल्याशी कशी वागतेय ह्यातून आपल्या
पासूनचे अंतर कमी जास्त करते.



कधीतरी स्वतःच्याच माणसांकडून
दुखावलेलं "एकटं
मन" तुम्हाला कुठे भरकट घेऊन जाईल
काही सांगता येत नाही.

याच काळात स्वतःला
सावरले तर ठीक नाही तर
आयुष्याच्या बऱ्याच चुका ह्या एकटेपणात
होतात.

ठराविक
वेळेत मिळालेले "जिव्हाळ्याचे दोन शब्द"
पण एखाद्या व्यक्तीला तुमच्या जवळ आणू
शकतात,

ते "जिव्हाळ्याचे दोन शब्द"
आपल्याला आपलं माणूस विसरायला लावून
नवीन
अनोळख्या व्यक्तीकडे ओढत नेतं.
"परिस्थिती आपली मनस्थिती ठरवते
आणि आपली
मनस्थिती आपली कृती ठरवते."
म्हणून
एकटेपणात स्वतःला जरा
सावरायचं,
मनाला जरा थोडंसं आवरायचं,
शांत करायचं थोडं मन,
अन मग काय ते
ठरवायचं...
कारण

"आयुष्यात प्रत्तेक चुकीला माफी मिळेलच
असे नाही"


ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.





आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !



आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही,
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही, 
अनुभव येत असतात प्रत्येकक्षणाला, ...
पण नशिबाचे चक्र थांबत नाही..
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, 
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही......


मित्रांनो !

बघा आठवतायत का ते दिवस ?



शाळेत असायचो तेव्हा सूर्य फुलाच्या भाजक्या बिया रोज खायचो ... ६ वी मधे असतांना एकदा कारकुन वर्गात आला आणि त्याने आमच्या शिक्षकाला आमच्या बाकड्या कड़े बघून सांगितले कि हे लोक रोज वर्गात कचरा करता ... एकतर मराठी माध्यम ... त्यात भकार गाजवणारे शिक्षक ... माझा मित्र सर आमच्या कड़े येतांना पाहून थरथरू लागला ... मी सरांना सकाळ-शिप चे मुल खात असतील म्हणून वेळ मारून नेली आणि गाल लाल रंगाचा होण्यापासून वाचवला ... आज तब्बल १० वर्षांनी सूर्य फुलाच्या भाजक्या बिया खाल्ल्या ....आणि अचानक शालेय जीवन काय होते त्याची भावनिक जागृति झाली ... बोरकुट, चिन्चोके, पोंगा आणि पेप्सी खावुन बालपण गेले .. काय मजा होती यार ... आता सी.सी.डी. च्या कॉफ़ी मधे ती मजा, ती निरागसता नाही ... भावना ह्या सोयी सुविधा आणि चकाकिच्या दुनियेहुन मोठ्या असता ... त्या कधी महालात पण नाही मिळू शकत पण रानात दडलेल्या असू शकता ... आणि कोणी झड़प घालावी तश्या ह्रुदयात शिरता ... तीच त्यांची जागा असते ... तसा मी ताज महल पण ३-४ वेळा पहिला आहे ... उत्तमच आहे तो ...प्रश्नच नाही ... पण रस्त्याने जातांना कधी शाळेची इमारत दिसली कि मन काय बोलू आणि वागू लागते ते शब्दात नाही सांगू शकत ... तिच्या त्या रंग उडालेल्या भिंती आणि वाचता न येणारा बोर्ड हां आमच्या साठी मुमताज महल हुन कैक पट सुन्दर आहेत हे नक्की !

आज वाटतंय का मोठे झालो आपण, ते शाळेतील दिवसच छान होते.


पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे. समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. 

स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे. माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात.





गाडी चालविणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता बाळगायला पाहिजे.

आपल्याला काय वाटते........??????