twitter



मला ते दिवस हवे आहेत ... ............... ...
सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ............... ...
दिवसभर चीनचा ,कैर्या पाडत उनाडक्या करायच्या ...
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आई कडे icecrm साठी हत्त करायचा ...
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा ...
मला ते दिवस हवे आहेत ............... ...
पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे ...


मित्रांची निर्मल मैत्री असायची
कदीच ती स्वार्थी नसायची ...
मला ते दिवस हवे आहेत ... ...............
एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गम्मत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची ...
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रतेक दिवस नवीन सुख आणायचा ...
माज्या लाडिक बोलण्याचा सर्वाना कौतुक असायचे ..
माज्या हुशारीचे बक्षीस भेटायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचा कडून च कळायचे ...

0 comments:

Post a Comment