twitter



अस्वस्थ हिंदुस्तान आणि करोडो हिंदुस्तानी...! हवाय एक विचार जसा चीन कडे आहे :- 

हिंदुस्तानी मीडिया किवा सरकारने सर्व हिंदुस्तंनिवासीयना एक गोड स्वप्न दाखवला होत, की हिंदुस्तान एक सुपर पावर होणार. पण सध्याची परिस्थिति बघून मला तरी नाही वाटत आपण त्या मार्गाने चाललो आहे! आशिया खंडामधून चीन आणि हिंदुस्तान ह्या दोन देशामध्ये कोण सुपर पावर बनणार हयाकडे पूर्ण जगाचे लक्षं वेधले आहे. सांगायला दुख होत आहे क
ी चीन आपल्यापासून खूप पुढे गेला आहे हे खूप उदाहरणावरून सांगता येईल..ओलांपिक, आर्मी, टेक्नॉलजी, शिक्षण, आरोग्य अशा कितीतरी बाबतील चीन नक्कीच पुढे आहे! आपण अजूनही कश्मीर साठीच लढतो आहे!

आज 65 वर्षांनंतर स्वातंत्र्यदिन साजरा करताना दहशतवाद, स्वैराचार, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट या साऱ्या भीतीदायक विचारांचा मनात कल्लोळ उठतो. देश खोकला होत चाललाय हे अनेक उदाहरण देऊन मी स्पष्ट करू शकतो- टीव्ही वर बातम्या बघायला गेलो की फक्त बाबा रामदेव , अण्णा ह्यांची आंदोलने किवा कुठेतरी -तोडफोड, आतंकी हमला, भ्रष्टाचाराच्या बातम्या. स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही ही अवस्था असावी ही जाणीव खिन्न आणि उद्विग्न करणारी आहे. आथिर्क व लष्करीदृष्ट्या सार्मथ्यवान असलेला आपला भारत देश…..;

दहशतवाद, भ्रष्टाचार, जातिभेद ह्या सर्व मगरमिठीतून कधी मुक्तहोणार…..?भारत-पाकिस्तान-काश्मीर हा तिढा सुटणार कधी? गरिबांना पोट भरून 2 वेळच जेवण कधी भेटणार?? आपल्या देशात जन्म घेतलेल्या बाळाला साला सकस आहार नाही भेटू शकत किवा एखाद्या शिक्षित मुलाला रोजगार नाही देऊ शकत? काय पाप केलाय - की अजूनही महिला असुरक्षित आहेत?? का आपले वैज्ञानिक बाहेरील देशात नोकरीला जातात?? ई, बंगलोर, चेन्नई , गोवा ई मेट्रो शहरांमध्ये परिस्थिति त्यामानाने ठीक आहे - पण जी राज्य देशाच्या बॉर्डरवर आहात त्यांना जीवन नको झालाय? निर्दोष शेकडो लोक असेच मरत आहेत - त्याबरोबर त्यांची स्वप्न ही मारून जातात - हे सर्व कधी थांबणार?

राजकारण्यांना आता फक्त स्वतची झोळी भरणे सोडून देशाचा विचार केला पाहिजे. निर्दोष सैनिक रोज मरत आहेत - आपल्या सैनिकाला अजूनही जुन्या बंदुकाचा पुरवठा केला जातो, तिकडे शत्रू आधुनिक शस्त्रे घेऊन वार करत आहे. आपल्या सैनिकांकडे हिम्मत शत्रूपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे पण आधुनिक शस्त्रांचा अभाव, आधुनिक टेक्नॉलजीचा अभाव ह्यामुळे असे मौल्यवान सच्चे देशप्रेमी आपण गमवत आहे! काडीचीही देशभक्ती नसणार्‍या राजकारण्यांना कधी समजणार आपल्या मौल्यवान लोकांचा जीव, त्यांची हिम्मत, त्यांची बहादुरी?? आपल्याकडे एक-से बडकर लोक आहेत - पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात. इग्रज जाता-जाता खूप मोठी राजकीय खेळी खेळला आहे - आणि त्याला हातभार म्हणून आपले राजकारणी विविध गटांमध्ये राजकारण खेळत आहेत. आणि ह्याचा परिणाम पूर्ण देश भोगत आहे.. आपलाच मित्र आपलाच वैरी वाटू लागला आहे - असा कसं हे घाणेरडा राजकारण??

खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र होणार कधी - कधी होणार हिंदुस्तान सुपर पावर…..?

माझ्या मते तरी भ्रष्टाचार, दहशतवाद आणि जातिभेद यासारख्या अनेक प्रश्नांच्या मगरमिठीतून मुक्त झाल्यावरच खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. जोपर्यंत राजकारण्यांचे नानाविध अघोरी खेळ, चाली, कट संपत नाहीत तोपर्यंत आपण पारतंत्र्यातच राहणार. ज्या दिवशी भ्रष्टाचार, जातिभेद आणि दहशतवादाला आळा बसेल तोच खरा स्वातंत्रदिन आणि तेव्हाच आपण सुपर पावर होऊ.

आपण रंगवलेल्या या नव्या स्वतंत्र भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे आणि ते ध्येय तरुण पिढीने बाळगले पाहिजे आणि माझ्या मते आपल्या सर्वांत ते बळ आहे. देशावर प्रेम करा - आणि एकतेला माना - एकते मध्ये खूप ताकत असते..!!

आपला मित्र, 

Vijay Gaikwad

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : Vijay Gaikwad   

0 comments:

Post a Comment