ज्या देशातील बहुसंख्य हिंदूच आपल्या देवादिकांची टिंगल करत, मोठ्या कौतुकाने त्यांच्यावर विनोद करतात. चित्रपट आणि नाटकातील त्यांचे विडंबन खपउन घेतात, त्या हिंदुना रशियामध्ये भगवत गीतेवर बंदी घालायची कोर्टात याचिका दाखल केली जाते त्याचे कसले सोयर सुतक असणार ? आम्ही फक्त बेंबीच्या देठा पासून ओरडणार " गर्वसे कहो हम हिंदू है "
क्रिश्चन लोकांना त्यांच्या बायबलाचा आणि मुस्लीम लोकांना त्यांच्या कुराणाचा जितका अभिमान आहे, तितका आपल्या हिंदू लोकांना भगवत गीते विषयी आहे का ? तर नाही हेच उत्तर आहे. ९० टक्के क्रिश्चन आणि मुस्लिमांच्या घरात त्यांचे पवित्र ग्रंथ असतात, तर ९० टक्के हिंदूंच्या घरात भगवत गीता नसतेच. स्वताच्या धर्मा विषयी अनास्था असलेला एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म.
इस्कोन चे संस्थापक प्रभुपाद स्वामी यांनी लिहिलेली भगवत गीता मराठी, हिंदी, इंग्रजी पासून जगभरातल्या ८० भाषा मध्ये उपलब्ध आहे. गेल्या ४० वर्षामध्ये त्याच्या ४० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्याच आपल्या पवित्र धर्म ग्रंथावर रशियामध्ये बंदी आणायची याचिका दाखल होते, आणि इथले सारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना मुर्दाडा सारखे गप्प बसून आहेत. केवळ धार्मिक तेढ वाढवायची आणि सत्तेचे राजकारण करायचे हाच यांचा हिंदुत्ववाद. नशीब विजू जनता दलाच्या एका खासदाराने हा प्रश्न संसदेत उपस्थित केला तेव्हा सारेच पक्ष जागे झाले आणि त्यांनी सदर घटनेचा निषेध केला.